top of page
Chanting 01.jpeg

भीष्म आय.के. एस. कॅप्सूल कोर्सेस
(ऑनलाईन)

Capsule Course.jpg

भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम ही भारतीय ज्ञान परंपरा अर्थात आय.के. एस. क्षेत्रातील देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे. भीष्म आय.के. एस. कॅप्सूल हा भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम ने सुरू केलेला एक नाविन्यपूर्ण आणि अभिनव उपक्रम आहे. भारतीय ज्ञान परंपरा म्हणजेच इंडियन - भारतीय नॉलेज सिस्टीम हे फार मोठे ज्ञान भांडार आहे. त्याचा आयाम फार विस्तृत आहे. विश्वातील सर्व प्रकारचे ज्ञान त्यामध्ये सामावलेले आहे. वेद, उपनिषद, पुराण, इतिहास, कला, शास्त्र, श्रुती, स्मृती, दर्शन, वेदांग, साहित्य, भाषा, नाट्य, संगीत, नृत्य, मंदिर, स्थापत्य, तंत्रज्ञान, विज्ञान, धरोहर, संस्कृती, परंपरा, अध्यात्म,  पर्यावरण, व्यवस्थापन, कौटिल्य राज्यशास्त्र, धर्मशिक्षण, मूल्यशिक्षण, नीती शिक्षण, सभ्यता, आरोग्य, शिक्षण व्यवस्था, समाजव्यवस्था, खेती, भूविज्ञान, गणित, विमानविद्या इ. विविध विषयांचा आणि ज्ञान श्रेणींचा यामध्ये समावेश आहे.

भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीमने भारतीय ज्ञान परंपरा अर्थात इंडियन नॉलेज सिस्टीम मध्ये विविध प्रकारचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यामध्ये सर्टिफिकेट, डिप्लोमा, मास्टर्स, पी. जी. डिप्लोमा, डॉक्टरेट, पोस्ट डॉक्टरेट अभ्यासक्रमांचा समावेश आहे. आतापर्यंत दहा हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी भीष्म स्कूलचे विविध अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. विद्यार्थ्यांना त्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये आणि वैयक्तिक कौटुंबिक जीवनामध्ये खूप चांगला लाभ झाला आहे. 
       
भारतीय ज्ञान परंपरेमध्ये अभ्यासाला कुठून आणि कशी सुरुवात करायची असा प्रश्न अनेकांना पडतो. सारे काही खूप चांगले आहे, आवडते आहे, 14 विद्या 64 कला सर्व काही शिकावे असे वाटते. अधिकाधिक विषयांचे ज्ञान व्हावे, कौशल्ये प्राप्त व्हावीत असे वाटते. पण शिकायला कुठून सुरुवात करायची ते कळत नाही. एवढे सगळे आपल्याला झेपेल का ? कळेल का ? असे प्रश्न पडतात. एवढ्या सगळ्या ज्ञानाची आपल्याला गरज आहे का असाही प्रश्न पडतो. आपल्या बुद्धीची तेवढी झेप आहे का ? आपल्याला सर्व समजेल का अशी भीतीही वाटते. काहींना वेळेची समस्या असते. डिग्री, मास्टर्स इ. अभ्यासक्रमांसाठी आवश्यक वेळ आपल्याला देता येईल का अशीही चिंता अनेकांना असते. तसेच एकदम सेमिस्टरची किंवा वर्षाची फी भरली आणि आपल्याला तो अभ्यासक्रम पूर्ण करता आला नाही तर आपले पैसे फुकट जातील असे वाटते. अनेकांना वाटते की सुरवातीला एखाद्या विषयाचे प्राथमिक ज्ञान झाले तरी पुरेसे आहे. विस्तृत अभ्यास नंतर करता येईल. आधी आपण विविध विषयांचे प्राथमिक ज्ञान घेऊया. तिथून सुरुवात करू या. या सर्व गोष्टींचा विचार करून भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम प्रस्तुत करीत आहे एक अत्यंत नाविण्यपूर्ण उपक्रम - भीष्म आय.के. एस. कॅप्सूल कोर्सेस

कॅप्सूल अभ्यासक्रमांची वैशिष्ट्ये

☑️ अल्पकालीन अभ्यासक्रम

☑️ भारतीय ज्ञानपरंपरा (IKS) विषयांचे मूलभूत आकलन

☑️ प्रत्येक विषयाची सर्वसमावेशक ओळख

☑️ आवडीनुसार अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य

☑️ उत्तम नियोजनासाठी तीन महिन्यांचे पूर्वनियोजित वेळापत्रक

☑️ पुनरावृत्ती अभ्यासासाठी रेकॉर्डिंगची सुविधा

☑️ भारतीय ज्ञानपरंपरेतील (IKS) विविध विषयांचा परिचय

☑️ परवडणारी शुल्करचना

☑️ भविष्यातील IKS शिक्षण प्रवासाचे नियोजन

☑️ प्रत्येक अभ्यासक्रमासाठी प्रमाणपत्र — रेझ्युमे आणि शैक्षणिक पोर्टफोलिओसाठी उपयुक्त

☑️ १२ कॅप्सूल अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एक मोफत प्रमाणपत्र अभ्यासक्रम

☑️ भारतातील अग्रगण्य IKS संस्थेकडून प्रमाणपत्र

IKS कॅप्सूल अभ्यासक्रम (ऑनलाईन) रचना

☑️ कालावधी – एक आठवडा (५ दिवस)

☑️ दिवस – सोमवार ते शुक्रवार

☑️ वेळ – रात्री ८:०० ते ९:१५

☑️ सत्र स्वरूप – ६० मिनिटांचे व्याख्यान + १५ मिनिटे प्रश्नोत्तर

☑️ वेळापत्रक – तीन महिन्यांचे वेळापत्रक – जुलै ते सप्टेंबर २०२६

☑️ सत्रांचे रेकॉर्डिंग उपलब्ध असेल

☑️ एकावेळी किती अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येईल?

  • वैयक्तिक सोयीप्रमाणे.

☑️ अभ्यासक्रमांची संख्या: दर आठवड्याला दोन कॅप्सूल अभ्यासक्रम

☑️ भाषा – मराठी

☑️ अभ्यास साहित्य – अध्ययन पुस्तिका (सॉफ्ट कॉपी)

हार्ड कॉपी मागणीनुसार उपलब्ध — अतिरिक्त शुल्क रु. १५०/-

☑️ अभ्यासक्रम शुल्क – रु. १५००/-

सवलतीच्या दरात फक्त रु. १२००/-

☑️ प्रमाणपत्र – ऑनलाईन प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल

हार्ड कॉपी अतिरिक्त शुल्क रु. १५०/- मध्ये उपलब्ध

विशेष ऑफर
१२ कॅप्सूल अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना रु. ६०००/- मूल्याचा एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम केवळ रु. ५००/- सुविधा शुल्क भरून विनामूल्य प्रवेशासाठी पात्रता मिळेल.

०१

उपवेद आणि वेदांगे (षडांगे)

०२

दहा प्राचीन उपनिषदे

०३

नास्तिक (अवैदिक) दर्शने

०४

१८ महापुराणे - प्राचीन भारताचा अस्सल लिखित इतिहास

०५

गोत्र आणि गोत्र ऋषी

०६

इंडिया नाही भारत... ओळख भारताची आणि ओळख भारतीयत्वाची...

०७

रहस्य सृष्टी उत्पत्तीचे

०८

लोक संस्कृती - लोक साहित्य लोक कला आणि लोक परंपरा

०९

चौदा विद्या आणि चौसष्ट कला

​१०

वेद चतुष्टय, ब्राह्मण ग्रंथ आणि आरण्यक ग्रंथ

११

षड्दर्शन (आस्तिक) वैदिक दर्शने

१२

उपपुराणे अर्थात गौण पुराणे

१३

मनुस्मृती आणि अठरा स्मृती ग्रंथ

१४

प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती

१५

आदि शंकराचार्य, शंकराचार्य पिठे आणि मठाम्नाय परंपरा

१६

नीति ग्रंथ - नीतिशास्त्र ग्रंथ

१७

प्राचीन भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान परंपरा

१८

आयुर्वेद चिकित्सा आणि आयुर्वेदाची मूलतत्वे

१९

महाकवी कालिदास आणि पंच महाकाव्ये

२०

षोडश संस्कार अर्थात अत्यंत महत्त्वाचे 16 संस्कार

२१

प्राचीन भारतीय मंदिरे आणि मंदिर स्थापत्य

२२

विविध गीता अभ्यास (भगवद्गीता सोडून)

२३

मूर्तिशास्त्र

२४

अष्टांग योग

अधिक माहितीसाठी संपर्क:
अपूर्वा राऊत – 8605302010

ई-मेल - capsules@bhishmaiks.org 

bottom of page